पुणे- पुण्या मुंबईसह अनेक ठिकाणी करोना चे थैमान सतावित असताना ,कर्फ्यू लागलेला असताना पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार तडाखा दिला . पावसाच्या सरींने वातावरणात थोडा गारवा जाणवला आहे. पुणे,औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.
पुण्यात काल सायंकाळी उशिरा पावसाच्या सरी कोसलल्या अनेक वाहने रस्त्यावरून घसरत होती रात्री उशिरा जोरदार पाउस झाला तसा आज दुपारी पावसाने पुण्याला जोरदार तडाखा दिला . आणि पुण्याला धुवून काढले . पुण्यानंतर नाशिक शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकसह जवळील भागातही पावसाच्या सरी बरसल्या. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाने शेतीचे चांगले नुकसान केले आहे. मुक्ताईनगर येथेही ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यातून या पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. यासोबतच पुण्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने सिंहगड परिसरात वीजेचा पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. सिंहगडसह कात्रज कोंढवा-मुंडवा परिसरातही जोरदार पाऊस आला. तसेच, बीड जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
मालेगाव शहरातही मंगळवारी रात्री 12.45 वाजता अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पाऊस सुरू झाला, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यासोबतच बुलडाण्यातही आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस पडला. तसेच, नवापूरमध्येही अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली.