पुणे- शहराला “राहण्या योग्य सर्वोत्तम शहर याकरिता ऑनलाईन पद्धतीने नागरिकांकडून फॉर्म
भरून घ्यावयाचे आहेत. याकरिता पुणे महानगरपालिकेतील मुख्य सभागृहात (जुन्या) प्रशिक्षण आयोजित
करण्यात आले होते.
डॉ. वनश्री लाभशेटवार, उपायुक्त (विशेष) यांनी सदर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना ऑनलाईन फॉर्म कसे
भरायचे याबाबत सविस्तर माहितीचे प्रशिक्षण दिले.
मुख्य कार्यालयातील क्षेत्रीय कार्यालयातील व मनपाच्या अन्य विभागातील अधिक्षक, उपअधिक्षक
स्तरावरील लेखानिकी संवर्गातील सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या सेवकांकडून स्वताच्या कार्यालयातील
सर्व सेवक, नातेवाईक, परिसरातील नागरिक यांना ऑनलाईन फॉर्म भरून देनेबाबत मार्गदर्शन करण्यात
येणार असल्याचे डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी सांगितले.
पुणे शहराला “राहण्या योग्य सर्वोत्तम शहर” (इज ऑफ लिव्हिंग) म्हणून सर्वेक्षणामध्ये सातत्याने
पहिला नंबर आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सदर फीडबॅकच्या आधारावर शहरांची रॅन्किंग
करण्यात येईल. हि प्रक्रिया दि. १ फेब्रुवारी २०२० पासून सुरु असून माहे फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु राहील.
यावरच निश्चित होणार आहे कि, कोणते शहर सर्वसामान्यांना राहण्यायोग्य आहे. या सर्वेक्षानांतर्गत सांगू
शकतील कि, आपले पुणे शहर सर्वसाधारण नागरिकांना राहण्यासाठी कसे आहे, इथे जीवन जगणे किती
सोपे आहे. राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता, शाश्वतता, सार्वजनिक सेवा, प्रशासन सेवा, पायाभूत
सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्थाबरोबरच इतर सुविधांचा कशा प्रकारे स्तर असेल,
याचा फीडबॅक हा आपल्या शहराचा रिपोर्ट कार्ड असेल असे त्यांनी सांगितले.