व्यवस्थापन शास्त्र विध्यार्थ्यांकडून ई-कॉमर्स संकेतस्थळ प्रकल्प
पुणे:
महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या बी.बी.ए. अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापनशास्त्र विध्यार्थ्यांकडून ई-कॉमर्स संकेतस्थळ प्रकल्प करण्यात आला आहे.अभ्यासक्रमातील प्रकल्प म्हणून काम करताना या विद्यार्थ्यांनी सर्वांचे कौटुंबिक व्यवसाय या संकेत स्थळाशी जोडून घेतले आहेत.’आझम डील’ असे या संकेतस्थळाचे नाव आहे.महमद सय्यद ,शेख जाहिद ,ससान जोएल ,एस्मतुल्ला हशिमी ,अब्दुल हकीम अताई (अफगाणिस्तान )या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प यशस्वी केला .त्यांना प्राचार्य डॉ शैला बुटवाला,डॉ.अलीफिया जहागीरदार ,प्रा .शिरीन नाझ शेख ,प्रा .खालिद अर्षद यांनी मार्गदर्शन केले .आता हा प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंनोव्हेशन,इनक्युबेशनसेंटर ला सादर केला जाणार आहे .