माजी सैनिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश भिलारे
पुणे :
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश भिलारे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदी जगन्नाथ लकडे,सचिव पदी बाळासाहेब जाधव,सहसचिव पदी अमोल पोतदार तर कोषाध्यक्ष पदी निरंजन काकडॆ यांची निवड झाली आहे. रवींद्र शेवाळे,शांताराम वाघ ,नरेंद्र गायकवाड,राजेंद्र गायकवाड हे सदस्य पदी निवडले गेले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत शासनमान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. जुनी पेन्शन ,बदली धोरण ,वर्ग १ आणि २ मध्ये आरक्षण ,माजी सैनिकांना आत्मसन्मानाची वागणूक मिळावी ,यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नूतन अध्यक्ष प्रकाश भिलारे यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कापसे ,कोषाध्यक्ष दीपक पाटील ,राज्य समन्वयक दिलावर शादीवान उपस्थित होते