जर्मन लेखकाची प्रभू येशू वरची भक्ती गीते आता सीडी द्वारे मराठीत !
१० फेब्रुवारी रोजी पंचहौद मिशन मध्ये प्रकाशन
पुणे :एच. बँलन्टाईन या जर्मन लेखकाची प्रभू येशू वरची भक्ती गीते आता सीडी द्वारे मराठीत येत असून पुण्यातील सुधाकर गायकवाड, आणि त्यांची कन्या मेरी गायकवाड यानी त्यासाठी पुढाकार घेतला आहे !
१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पंचहौद मिशन मध्ये प्रकाशन जोसेफ साळवी यांच्या हस्ते सीडी चे प्रकाशन होणार आहे.
‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’, पुणेच्या वतीने’ येशू प्रभू माझा ‘या नावाने १० भक्तिगीते
(ध्वनिमुद्रित) करण्यात आली आहे. ‘येशू प्रभु माझा’ या भक्तीगीताची संकल्पना सुधाकर
गायकवाड यांची असून ‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’च्या मेरी गायकवाड
यांनी निर्मिती केली आहे. ही भक्तीगिते जर्मन लेखक एच. बँलन्टाईन यांनी लिहिली
असून ते जर्मनी मधील प्रसिद्ध लेखक – साहित्यिक आहेत.
प्रभू येशूवर आतापर्यंत साहित्य – कथा – कादंबऱ्या – खंड – अनेकांनी अनेक
प्रकारचे – लिखाण आपआपल्या परीने देशात – विदेशात केलेले आहे. अनेक विचारवंतांनी
आपले योगदान दिले आहे. ख्रिश्चन हा धर्म नाही तर प्रभूकडे जाण्याचा मार्ग आहे. शत्रूवर
प्रेम करा. एकमेकांशी प्रेमाने वागा. नम्रता व प्रीतीने वागावे ही भावना मनात ठेवावी. नम्रता
– प्रीती – प्रेम – एकमेकांबद्दल आदर ठेवावा ही शिकवण प्रभू येशूने दिली आहे. याच भावना सीडीतील गीतांमध्ये आहे, असे सुधाकर गायकवाड यांनी पत्रका द्वारे सांगितले.
सुधाकर गायकवाड व मेरी गायकवाड हे कलाकार – गायक आहेत. १० भक्तीगिताच्या (ध्वनिमुद्रीत) कॅसेटच्या माध्यमातून प्रभू येशूची मानवतावादी
शिकवण अनेक समाज घटकापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.