विशेष मुले,बालरुग्ण आणि दिव्यांगांनी लुटला’ ख्रिसमस पार्टी ‘ चा आनंद !
रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल ‘ चा सलग २१ व्या वर्षी उपक्रम
पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल ‘,इनरव्हील क्लब ऑफ पुणे सेन्ट्रल यांच्या वतीने २५० विशेष मुले,बालरुग्ण आणि दिव्यांगांसाठी’ ख्रिसमस पार्टी ‘ चे आयोजन १८ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता द लेडीज क्लब (पुणे कॅम्प) येथे करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष होते.
खेळ, संगीत, खाऊ, टॅटू आणि सांताक्लॉजने दिलेल्या गिफ्टस् अशा वातावरणात विशेष मुले ,बालरुग्ण आणि दिव्यांगांना आनंद लुटण्याची संधी मिळाली !
रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल चे अध्यक्ष जिनेन्द्र मुनोत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष् आशा नायक, या उपक्रमाचे संयोजक अनील बोरा,मुनीर चिनॉय यांनी संयोजन केले. टीना यादव यांनी लहानग्यांना नृत्याचा आनंद दिला.
विविध हॉस्पिटल मधील असाध्य विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधीर शाळातील विद्यार्थी, दिव्यांग, मनोरुग्ण, तसेच अनाथगृहातील २५० मुले या पार्टीत सहभागी झाले. ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘ द लेडीज क्लब ‘ ने त्यांचा परिसर या उपक्रमासाठी देवू केला ,तर सतीश शेट्टी यांनी मुलांसाठी खाऊ देण्याचे नियोजन केले.