आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत १०७० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत ३६ शाळांच्या १०७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शनिवारी सकाळी ही स्पर्धा आझम कॅम्पस च्या मैदानावर झाली.
संस्थेचे सचिव लतीफ मगदूम,तसेच सौ. सरोजिनी मगदूम, सय्यद सईद अहमद,एड.हनीफ शेख यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाट्न झाले. स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. यावेळी रबाब खान,हेमा जैन हे मान्यवर उपस्थित होते. भारत लोंढे,महेश निरंतरे,सुभाष खंडाळे,सलमा परवीन यांनी परीक्षण केले.रुमाना शेख,शमा सय्यद यांनी स्पर्धेचे संयोजन केले. नाहीद पटेल यांनी स्वागत