पुणे:
महाराष्ट्र कॉमोपोलीटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली .आंबेडकर हाऊस,फुले हाउस,आझाद हाऊस ,सर सय्यद हाऊस या ४ संघांनी भाग घेतला .आंबेडकर हाउस संघाने प्रथम पारितोषिक पटकावले .नीलिमा साठे,हीना झरेकर,सना शेख यांनी परीक्षण केले .मुख्याध्यापक रुमाना शेख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .पर्यवेक्षक झकिया पटेल यांनी आभार मानले .