‘अँटी रॅगिंग’ विषयावर डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचा महाराष्ट्र काॅस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगुनवाला दंत महाविद्यालय व संशोधन संस्थेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी ‘अँटी रॅगिंग‘ विषयावर संवाद कार्यक्रम नुकताच पार पडला .
या संवादामध्ये विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये ‘अँटी रॅगिंग‘ विषयावरील प्रश्नाचे निरसन केले. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यी कल्याण विभागाचे संचालक डाॅ संदिप गुंडरे यांनी ‘ अँटी रॅगिंग‘ विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर अँटी रॅगिंग चे होणारे दुष्परिणाम व त्यामुळे पालक व विद्यार्थी यांचे होणारे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक नुकसान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचे स्वागत महाराष्ट्र काॅस्मोपोलिटन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डाॅ पी. ए. इनामदार व उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. रमणदिप दुगल यांनी केले, दंत महाविद्यालयाचे कुलसचिव आर्. ए. शेख यांनी आभार मानले.