‘रुरल इंडिया ‘ वार्षिक परिषदेचा समारोप
पुणे : ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे पुण्यात ‘रुरल इंडिया ‘ या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा झाली . देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी झाले . वारजे ,पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात ७ ते ९ नोव्हेंबर रोजी ही परिषद पार पडली . राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज चे संचालक विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन ७ नोव्हेंबर रोजी झाले . टाटा ट्रस्ट्स चा एक सामाजिक उपक्रम असलेले ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हे या परिषदेचे आयोजक होते.
पहिल्या दिवशी ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे .
‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर ,सल्लागार अजित कानिटकर, गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ ) ,गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी झाले . परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ),श्रीजित मिश्रा ,सी. शंभू प्रसाद ( ईसीड ईर्मा ), बिक्षम गुज्जा (अॅग श्री, हैदराबाद ), उषा गणेश, अंशू भारतीय, मारुती चापके ( गो फॉर फ्रेश, मुंबई )हे मान्यवर सहभागी झाले . परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे १५० तज्ज्ञ उपस्थित होते .
ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले गेले . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले गेले . शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’कीटकनाशकांचे परिणाम ,विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस चर्चा झाली .