90 अभिनेत्रीं साठी गायलेली 90 “लता गीते “होणार सादर
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त 27 सप्टेंबर रोजी ‘ आवाज एक, चेहरे अनेक ‘ चे आयोजन
पुणे:90 अभिनेत्री साठी गायलेली 90 सदाबहार “लता गीते ” सादर करून पुण्यात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तेजस थिएटर्स निर्मित ,आरती दीक्षित प्रस्तुत ‘ आवाज एक, चेहरे अनेक ‘ हा कार्यक्रम 27 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.
कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता केक कापून पुणेकर रसिक वाढदिवस साजरा करणार आहेत.
संयोजक आरती दीक्षित यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.
नर्गिस, मीनाकुमारी , वैजयंतीमाला, शर्मिला टागोर हेमामालिनी ते ऐश्वर्या राय अशा 90 अभिनेत्री साठी लता मंगेशकर यांनी गायन केले आहे. त्या 90 अभिनेत्रीं वर चित्रित झालेली निवडक 90 गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.एकूण 6 गायक , 8 वादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.सूत्रसंचालन विनया देसाई आणि विनिता गुंदेचा करणार आहेत.
दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.