नगरसेवक तुमच्या दारी…..(व्हिडीओ)
पुणे- फेसबुक वरून लाईव्ह चर्चा वा भेटीला नाही ,वृत्तपत्रातून आवाहने नाही …पण प्रत्यक्ष कठीण समय दिसता ..नगरसेवक दारी दिसू लागला तर ..
हि संकल्पना कॉंग्रेसचे महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांनी घरोघरी किराणा मालाच्या पिशव्या वाटप करून राबविली आहे. देश लॉक डाऊन ..कामकाज ठप्प ,नौकरी बंद ,काम आणि कमाई या दोहोंची चिंता त्यात कोरोनाचे भय अशा स्थितीत घरातच
बसून जेव्हा कोरोनाशी फाईट करण्यास सर्वप्रथम प्राधान्य देण्याची वेळ येते तेव्हा खारीचा वाटा घेऊन नगरसेवक दारी आला तर …
आणि हो खरेच आपल्या प्रभागात ,विधानसभा मतदार संघात अरविंद शिंदे यांनी किराणा मालाचे घरोघरी वाटप करत अशा प्रकारे चिंता सर्व नाही पण चिंतेतून थोडा दिलासा द्यायचा प्रयत्न केलाय ..पहा हा व्हिडीओ…