पद्मावती नगरचा ..तो जीवघेणा आणि बेकायदाच रस्ता -सुभाष जगताप (व्हिडीओ)
पुणे-धनकवडीतील हत्ती चौकातून पद्मावतीनगरच्या जागेत नेणारा ,डोंगर फोडून होणारा रस्ता हा जीवघेणा च होणारा असून तो रस्ता बेकायदेशीर पद्धतीने होत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे. या रस्त्याबाबत धनकवडीतील अप्प्पा परांडे आणि गुलाबनगरच्या अनिल बटाणे या दोन कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत या रस्त्याच्या विरोधात आवाज उठविला . हा रस्ता अस्तित्वात आला तर येथून ये जा करणाऱ्या धनकवडी, गुलाबनगर ,भारती विद्यापीठ, आंबेगाव, कात्रज आदी परिसरातील वाहन चालकांचा जीव धोक्यात येणार असल्याचा आरोप त्यांनी केला होता .
या पार्श्वभूमीवर पद्मावातीनगर च्या पदाधिकाऱ्यांनी आपले स्पष्टीकरण करताना पद्मावती नगर ला हत्ती चौकात नेणारा डीपी रस्त्यावर महापालिकेचे क्रीडा संकुल उभारल्याने तो रस्ता या संकुलालगत सर्व आवश्यक ती काळजी घेवून महापालिका करत असल्याचा दावा केला होता .
यावर बोलताना सुभाष जगताप म्हणाले ,पद्मावती नगरच्या पदाधिकाऱ्यांचा दावा खोटा आहे. त्यांना जेथून रस्ता दिला जातोय त्याची तळापासून ची उंची २० फुट एवढी आहे आणि रस्ता अवघ्या ७० ते ८० फुटाचा आहे. रस्त्यांच्याबाबत असलेले सर्व नियम धुडकावून असा रस्ता केला तर तो अपघाती रस्ताच होणार आहे यात शंका नाही .यामुळे या रस्त्याचे काम त्वरित थांबवा अशी मागणी आपण महापालिका अधिकारी यांच्याकडे करत आहोत . आमच्या सोसायटी ला दिलेल्या रस्त्यावर महापालिकेने क्रीडा संकुल उभारले हा दावा हि खोटा आहे . हे क्रीडा संकुल महापालिकेचे सर्व नियम पाळून ,परवानग्या घेवून उभारलेले आहे.फक्त पद्मावती नगर साठीच महापालिकेच्या ले आऊटमध्ये ओपन स्पेस मधून रस्त्याच्या कामाला केलेला प्रारंभ त्वरित थांबवावा .अशी मागणी आपण केली आहे. क्रीडा संकुलाबाबत चुकीची माहिती जर महापालिका अधिकारी देत असतील तर त्यांच्यावर आपण कारवाई साठी आग्रही राहणर असल्याचे जगताप यांनी सांगितले.