अवघ्या ८ हजार पगारावर लढताहेत ३४० कोरोना योद्धे (व्हिडीओ)
पुणे- पुणे हे उणे नाहीच .. इथे कोरोनाशी 2 हाथ करणारे कोण आहेत ? काय त्यांची अवस्था आहे ? हे देखील जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे . याला निमीत्त झाले ते आज असे अनेक कोरोना योद्धे असलेल्या …तरुणी ,महिला महापालिका आयुक्त कार्यालयात आपली व्यथा मांडायला आल्याचे दिसले . २०१५ पासून ठेकेदारी पद्धतीवर आम्ही महापालिकेच्या आरोग्य खात्यात काम करतोय , अवघ्या 6 हजार रुपये पगारावर त्या जॉईन झाल्यात . आणि तब्बल ५ वर्षात त्यांचा पगार आता झालाय ८ हजार रुपये , जो प्रत्यक्षात त्यांच्या हातात साडेसात हजार रुपये एवढाच पडतोय . ना आम्हाला विमा कवच ना अन्य कुठली सुविधा ,सुरक्षा …अशा अवस्थेत आम्ही यंदा आलेल्या या ऐतिहासिक संकटाचा मुकाबला करतोय हे सांगायला आलेल्या आरोग्य सेविका…आमच्या सारख्याच आरोग्य सेविकांना पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र २३ हजार रुपये पगार मिळतो हे हे सांगत होत्या ,एवढी तफावत का ? असा सवाल करत होत्या .
एकी कडे दिसत असताना दुसरीकडे याच महापालिकेत आरोग्य विभागात सुरु असलेल्या नौकर भरती साठी मुलाखती द्यायला आलेल्यांची गर्दी दिसून येत होती .. मग सांगा कुठे आहे उणे आमचे पुणे …? पहा छोटीसी
व्हिडीओ झलक ….
https://www.youtube.com/watch?v=sGHzWUw6XcI