पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात ..तसा कोरोना येथे उणे नाहीच ..अन हटवादी लोकांची इथे कमतरता नाही . जनता कर्फ्यू झाल्यानंतर लॉक डाऊन सुरु झाले .. दिवसेदिवस पुणे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडेल असे काही दिसेना ..पण शासकीय पातळीवरून होणारे प्रयत्न हि पराकाष्ठेने सुरूच आहेत .अशाच प्रयत्नांना चक्क एकमेव लोकप्रतिनिधीने हाथभार लावला आहे. हा लोकप्रतिनिधी दररोज वेगवेगळ्या भागात भोंगा घेऊन फिरतो आहे. आणि लोक हो घरातच बसा हो अशी आरोलो ठोकतो आहे.
पोलिसांची आरोळी वेगळी अन लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची आरोळी -दवंडी वेगळी …पण हडपसर परिसरात मात्र रस्त्यावर लोक दिसतातच .
जन पळभर म्हणतील हाय हाय …ची प्रचीती इथे येते .. कोणी काहीही म्हणो..पण लोकांना , कोरोनाचे संकट गंभीर पणे घ्या अशी आर्त विनवणी करणारा जनहितासाठी झपाटलेला हा एकमेव लोकप्रतिनिधी पुण्यातून दिसून येतो आहे. त्याची माय मराठीने घेतलेली हि झलक पहा ….