गणेश मूर्तीकरांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई दि. २२ मे-केंद्रिय मंत्री जावडेकर यांनी आज मह्त्वपूर्ण निर्णय घेतला व पीओपीच्या मूर्तींवरील बंदीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली .
दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीची आढावा घेण्यासाठी नुकतेच कोकण दौ-यावर असताना पेण येथील गणेश मूर्तिकांराच्या संघटनांनी पीओपी पासून बनविल्या जाणा-या गणेश मूर्तींवरील बंदी उठविण्याची विनंती दरेकर यांच्याकडे केली होती. पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी या प्रश्नी पुढाकार घेतला होता. याप्रश्नी रवीशेठ पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र दिले होते. कोकणच्या दौ-यात प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत पेण येथील नगरपालिका सभागृहात यासंदर्भात बैठक झाली. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या मूर्तीकारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रविण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याशी बोलणे केले व मूर्तीकारांचा गंभीर प्रश्नाकडे त्यांच्या निर्दशनास आणून दिले होते. यासंदर्भात केंद्रिय मंत्री जावडेकर यांनी आज मह्त्वपूर्ण निर्णय घेतला व पीओपीच्या मूर्तींवरील बंदीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो मूर्तीकारांचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे. पेण यथील नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीला विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासह माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार प्रशांत ठाकुर, आमदार महेश बालदी ,आमदार निरंजन डावखरे,आमदार रमेश पाटील, आमदार प्रसाद लाड, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, ज़िल्हाध्यक्ष महेश मोहिते जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटिल आदी उपस्थित होते.