पुणे-एका पत्रकाराने अजित पवारांना पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही”. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं उत्तर दिलं.
राज्यात करोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. तसंच काही निर्णय ३१ मार्च २०२० पर्यंत झाले होते, पण आता आम्ही निर्णय घेतला आहे पुढचे आदेश निघेपर्यंत सर्व निर्णयाची अमलबजावणी सुरु राहील अशी माहिती यावेळी दिली. दरम्यान यावेळी पत्रकारांना पार्थ पवार यांचा उल्लेख करताच अजित पवार यांनी त्याचा बाप सांगतोय ना…असं आपल्या शैलीत उत्तर दिलं.