पुणे-
सत्ताधारी भाजप पक्षाच्या विरोधात मनपाच्या विकास कामातील निविदा (टेंडर) मधील गोंधळ कारभार व साडेचार हजार कोटीचा भ्रष्टाचार यासंदर्भात तसेच पुणे सातारा रस्ता बीआरटी, जलपर्णी याची ही सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी राष्ट्रवादी पर्वती मतदार संघाच्यावतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मित्र मंडळ चौकात भांडाफोड आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नितीन कदम व कार्याध्यक्ष दिलीप अरूंदेकर यांच्या नेतृत्वाखाली भांडाफोड आंदोलन करण्यात आले.यावेळी पर्वती मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले भ्रष्टाचाराची अँटी करप्शनद्वारे झालेल्या कामाची चौकशी करावी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
यावेळी अश्विनी कदम( नगरसेविका) म्हणाल्या, मनपाच्या विकास कामातील निवेदान(टेंडर) मधील गोंधळ कारभार बाबत पुणे शहरातील ठीक ठिकाणी भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच यापुढे होणाऱ्या कामावर नजर ठेवण्यात येईल.
याप्रसंगी दिलीप बराटे, अश्विनी कदम, प्रशांत जगताप, प्रिया गदादे, प्रदीप देशमुख, विनायक हनमघर,मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, शिवाजी गदादे पाटील, संतोष नांगरे, अश्विनी सावंत, अमोल ननावरे, वैजनाथ वाघमारे, पंडीत कांबळे, गौरी जाधव, प्रेम गदादे, संतोष पिसाळ,आनंद बाफना, दादासाहेब सांगळे, सचिन पासलकर,गणेश मोहिते, ह रुपेश आखाडे, महेंद्र गावडे, हरीश खडेकर, शांतीलाल मिसाळ, संग्राम होनराव,फारुक शेख, समीर पवार,प्रशांत कदम, साहिल तांबोळी, शिवम इभाड,स्वीकार देशपांडे अभिजीत भिसे, श्रीकांत मेमाने,प्रमोद संचेती, निलेश नवलाखा,संदीप काळे, संतोष वचने,सचिन बनसोडे, योगेश वराडे, योगेश वराडे अरुण धावरे, अभिजीत उंद्रे. प्रदीप शिवशरण, समीर पवार, सुभाष पवार, प्रवीण खत्री, मंगेश जाधव, स्वीकार देशपांडे, सचिन समेळ इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.