पुणे- वंचित बहुजन आघाडी आता राज्यात एन आरसी आणि सीएएच्या विरोधात रान उठवणार आहे. येत्या 24 तारखेला प्रकाशआंबेडकरांनी बंदची हाक दिलीय. या बंदमध्ये एकुण 35 संघटना सहभागी होणार आहेत. एन आरसी आणि सीएए हा कायदा मुस्लिम आणि हिंदुंच्यापण विरोधात आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवतोय. ज्यांना आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलंय.देश हा दारुडं सरकार चालवत असल्याचीही टीका यावेळी आंबेडकरांनी केली आहे.