पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. १२ अॉक़टोबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित बाईक रॅलीला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात चंद्रकांत दादा पाटील दिवसेंदिवस आपली पकड घट्ट करीत आहेत.
महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी येथील कार्यालयापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. बालेवाडी गाव, बाणेर गाव,पासपोर्ट भवन, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण गाव, शिवाजी पुतळा इथून ही रॅली मार्गस्थ झाली. तर सोमेश्वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. अनेक तरुण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने झेंडे हातात या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीने दादांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या रॅलीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, नगरसेविका ज्योतिताई कळमकर, स्वप्नाली ताई सायकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
पाषाण भागातील श्री सोमेश्वर मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी दादांनी भगवान महादेवांची मनोभावे पूजा करुन, विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयासाठी महादेवांना साकडं घातलं.
टीम इंडियाकडून ही दादांना शुभेच्छा
बाईक रॅली बाणेर रोडवरून जात असताना, पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या कसोटीतील खेळ संपवून टीम इंडिया बसमधून मुक्कामी हॉटेलवर जात होती. यावेळी टीम इंडियाला पाहून रॅलीतील तरुणांनी मोठा जल्लोष केला. या जल्लोषाला प्रतिसाद देत टीम इंडियाकडून दादांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर दादांनी देखील टीम इंडियाला कसोटी विजयासाठी व्हिक्टरी निशाणी दाखवून प्रतिसाद दिला!