पुणे-प्रभाग क्र. 10 मध्ये सार्वजनिक ठिकाणी सोडीएम हायपोक्लोराईडची व धूर फवारणी करण्याचे काम नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील यांनी हाथी घेतले आहे.
माय मराठी शी बोलताना ते म्हणाले, कोरोना वरती उपाययोजना म्हणून निर्जंतुकरनासाठी संपुर्ण बावधन व प्रभाग क्र. 10 मध्ये सार्वजनिक ठिकाणी सोडीएम हायपोक्लोराईडची व धूर फवारणी करण्यात आली लवकरच सॅनीटायझर देखील वाटप करण्यात येणार आहे स्वतः प्रत्येक सोसायटीत व भागात वैयक्तिक फिरून सर्वाना काळजी घेण्यास सांगत आहेत.. भाजपप्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच भाजपच्या पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना आपापल्या भागात नागरी आरोग्या च्याहितासाठी सतर्क राहून कार्य करण्याचे आवाहन केले होते.