पुणे- कॉंग्रेसचे अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल धनवडे ,मनसे चे अजय शिंदे अशा तिघांचा सामना एकटीने करत भाजपच्या उमेदवार आणि पुण्याच्या महापौर पदावर गेली तब्बल अडीच वर्षे आणि आजही असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांनी कसब्याचा बालेकिल्ला सहजगत्या जिंकून घेत आपले आमदारकी चे स्वप्न देखील अगदी लीलया पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे. कसब्यात राज ठाकरे यांनी जरी सभा घेतली असली तरी त्यांचा विजय होणार होता तसा तो झाला आहे.
कसबा मतदार संघ –
1. अजय शिंदे (मनसे) – 8284
2. अरविंद शिंदे (काँग्रेस) – 47296
3. मुक्ता शैलेश टिळक (भाजप) – 75492
4. तोसिफ अब्बास शेख (संभाजी ब्रिगेड) – 594
5. अल्ताफ करिम शेख (अपक्ष) – 196
6. धनावडे विशाल गोरख (अपक्ष) -13989
7. नवनाथ गेनुभाऊ रणदिवे (अपक्ष) – 161
8. नाईक स्वप्नील अरूण (अपक्ष) -146
9. युवराज भुजबळ (अपक्ष) – 1072
10. राजेश सिसराम जान्नू (अपक्ष) -307
11. नोटा – 2528
एकुण मतदान 150069
विजयानंतर माध्यमांशी बोलताना पहा त्या काय म्हणाल्या ….