पुणे-हवेत रहाणे ,अविर्भावात वागणे अशा स्वभावाने यशा पर्यंत पोहोचलेल्या आपल्या प्रतिस्पर्धी भाजपच्या भीमराव तापकीरांनी अखेरीस अस्मान दाखविले .आणि जवळ जवळ ‘हारी हुई बाजी ‘ जिंकून दाखवीत , निकराची झुंज देत तापकीरांनी हि विजयाची माला प्राप्त केली आहे. खडकवासल्यात शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार, नगरसेवक सचिन दोडके आणि आमदार भिमराव तापकीर यांच्यात विजयासाठी झुंज पाहायला मिळाली. अखेर तापकीर यांनी 2100 मतांनी विजय मिळविला. तापकीर यांना 1 लाख 18 हजार 627, सचिन दोडके यांना 1 लाख 16 हजार 512 मते मिळाली. दरम्यान, दोडके यांनी मतमोजणी होण्यापूर्वीच मतदारसंघांत विजयाचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात झळकविले होते. त्यामुळे खमंग चर्चांना उत आला होता. तर, आज दोडके यांचा केवळ 2100 मतांनी पराभव झाला . अगदी हारलेली बाजी तापकीरांनी जिंकून कशी नेली हे शेवटपर्यंत त्यांना समजेनासे झाले .