संस्कार प्री-स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
पुणे : लहानग्यांवर मायेने, तसेच प्रेमाने संस्कार करणाऱ्या धायरी येथील ‘संस्कार प्री स्कूल आणि डे-केअर’चा वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात झाले. धायरी फाटा येथील मानस सोसायटी क्लब हाऊसमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्ले ग्रुप, नर्सरी आणि डे-केअरच्या सर्व मुलांनी नृत्य व नाटयाचे सादरीकरण करत कार्यक्रमात रंग भरले. नर्सरीच्या मुलांनी ‘वाहतुकीचे नियम’ या विषयावर नाटिका सादर केली. तर विविध कलाविष्कार सादर करताना बालचमूंचा रंगमंचावरील वावर आणि बोलण्या मधील आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता.
‘संस्कार प्लेग्रुप आणि नर्सरीमध्ये येणाऱ्या मुलांना अधिकाधिक कृतिशील शिक्षण देण्यावर भर दिला जातो. मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीची जवळून ओळख व्हावी, म्हणून विविध सण उत्साहाने साजरे केले जातात. येथे येणाऱ्या मुलांना घराइतकाच आपुलकी व जिव्हाळा देण्याचा प्रयत्न असतो. येथील शिक्षिका, मावशी मुलांचा आहार आणि वैयक्तिक स्वच्छता यासह त्यांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देतात. कलागुणांचा विकास व्हावा म्हणून संगीत, नृत्य, चित्रकला विषय शिकवले जातात तसेच संस्कार वर्ग घेतला जातो. संस्कार प्री-स्कूल आणि डे-केअर म्हणजेच मुलांचे गोकुळ आहे,” असे संचालिका आरती तुंगारे यांनी सांगितले.