सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या ३३ विद्यार्थ्यांना परदेशातील हॉटेलामध्ये इंटर्नशिपची संधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाअंतर्गत सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या ६० विद्यार्थ्यांची भारतातील व परदेशातील फाईव्ह स्टार व सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. २०१८ ते २०२१ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश असून, त्यातील ३३ विद्यार्थ्यांना न्यूझीलंड, मालदीव, मॉरिशस, अमेरिका, फ्रान्स, दुबई आदी ठिकाणी नामांकित आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये चार महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या वर्षीही ४१ विद्यार्थ्यांना अशाच नामांकित हॉटेल्समध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली होती.
या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सर्व मुलाखती आणि पात्रतेचे निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. या ३३ विद्यार्थ्यांची स्कायलाइन, क्वीन्सटाउन, आरआययू, क्रेओल रिसॉर्ट, हिल्टन टापो, विलिस, विलिंग्टन, कोपर्थोर्न, हॉटेल ग्रँड विंडसर, सेबेल ऑकलंड, क्राउन प्लाझा क्राइस्टचर्च, किंग्जगेट हॉटेल, आरआययू हॉटेल्स अँड रिसॉर्ट, हॉटेल आऊट्रिगर, हॉटेल आमिरिस्टर ब्लॅक हॉक, रेड्जेस लेकलँड रिसॉर्ट, सेन्सिमर लैगून, शेरेटोंन ग्रँड, ताज गेटवे, ग्रँड हयात गोवा, जेडब्ल्यू मॅरियट आदी हॉटेल्समध्ये निवड झाली आहे.
अनुष्का आहेर, सयालम अन्सारी, मिहिर चतुफुले, स्वरदा चिंचवडकर, जयंत देशमुख, ऐश्वर्या देशपांडे, मानसी ढमाले, अथर्व गायकवाड, शुभम गोटकुले, ऋषिकेश हबीब, हृतिक हुलावळे, संकेत कलाटे, रोहन कुलकर्णी, ऋषिकेश मगदूम, कुणाल मोरे, प्रसाद चौरे, गजेंद्र पुरोहित, केल्विन रँगल, अनिकेत राजवाडे, श्रेयश राठोड, अनिकेत शहा, जय ठाकोरे, शार्दुल टिल्लू, दुर्गेश वराडे, गौरव वंधारे, विकास यादव या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्राध्यापकांचे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी अभिनंदन केले.
डॉ. चोरडिया म्हणाले, “वर्षभर विद्यार्थ्यांना फील्ड वर्क, लाइव प्रोजेक्ट, वर्कशॉप, फूड फेस्टिवल, होटल, बेकरी, इंडस्ट्रियल किचन यांसारखे उपक्रम राबविले जातात. उद्योग व विविध विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून व्याख्याने, कार्यशाळा होत असतात. विद्यार्थ्यांनाही स्वतः अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक उपक्रमांतही विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, मेडिटेशन, खेळ, एरोबिक्स आदी उपक्रम होतात. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना चार महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानुसार ‘सूर्यदत्ता’ विद्यार्थ्यांना भारतासह परदेशात इंटर्नशिपसाठी संधी देते. हे यश विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग व नियमित उपस्थिती आणि विविध उपक्रम हे या यशात महत्वपूर्ण ठरले आहे. आज अनेक विद्यार्थी नामांकित हॉटेल आणि कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करताहेत, हे पाहून आनंद वाटतो.”