सेंट फिलीक्स हायस्कूलच्या मुलींचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश
पुणे : सेंट फिलीक्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ या क्रीडा प्रकारात यश मिळवले. होरांगी तायक्वांदो अकॅडमीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भारताकडून महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगना, राजस्थान, पंजाब, आसाम, गोहाटी, मध्यप्रदेश, गोवा कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण पुमसे आणि किरोगी प्रकारामध्ये ३,५७५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
यामध्ये शाळेतील रित अग्रवाल, अनन्या सुब्रह्मण्यम, दिशा मिश्रा, सई दिघे, जॉयस भालेराव, निधी धेंडे, ईश्वरी पोमन, आयूषी कांबळे, अविका येलपूर, समृद्धी नागाले, सहारा चौधरी, शाल्मली कुलकर्णी, श्रुती मोहीते, श्रूशीत बांदीवडेकर, आस्था मुथा, ब्राम्ही देशमाणे, हृषिता काळे, नक्षत्रा जाधव, अनुष्का वाघमारे, नियती धेंडे, ऐंजल चांदेवाल, एलेना सेराव, आकांक्षा डहाणूकर, अक्षदा डहाणूकर यांनी सुवर्णपदक पटकावले. वेदिका गवळी, तिष्या मोटघरे, पलक परादेशी, नित्या पिंगळे, रुमायजा मेमन, समिक्षा साबळे, महीमा जोसेफ, नंदीका शिंदे, मृपल देशपांडे, ईशिता राजपूत, रिशोना लिविस, शमिका रानडे, राशी वाल्मिकी, केतकी खोपकर, दृष्टी मिश्रा, जानवी जठार यांनी रौप्यपदक पटकावले.
तसेच सान्वी चिचोले, श्रध्दा खोचे, कल्याणी हिंगे, क्षितिजा ताकतोडे, गिरीजा चौधरी, आरुषी शेवाळे, अक्षता जठार, सानिधी खंडोळे, मिशेल गायकवाड, दोरोथी उल्लागड्डी, आफीया शेख, उदांतीका भालेराव, रुचीता रोकडे, वैष्णवी गुप्ता, उन्नती साळवे, ईशा ठाकूर, जेनेस साहू, प्रार्थना बांदिवडेकर, रिशोना त्रिभूवन, पयोजा जाधव, सानीया शेख, सानीया सुब्राम्हण्यम, ॲडेल अल्फोन्सो, स्तुती कोंडेती, कृष्णा देवकर, प्राची ऐनापूर व अँजेल बार्ला यांनी कांस्यपदक पटकावले.
सेंट फिलीक्स हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर तारा, सुपरवायझर सिस्टर ऐलसा, सुपरवायझर लिना पॉल, क्रीडा शिक्षिका सोनाली राजेभोसले, रुपाली बनसोडे यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सुर्वण व रौप्य पदक विजेत्यांना दक्षिण कोरीयात विशेष सवलतीत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. जिजाऊ शिवछत्रपती पुरस्कार विजेते मास्टर बाळकृष्ण भंडारी व रविंद्र भंडारी यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.