राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘होरांगी’च्या खेळाडूंची सलग चौथ्या वर्षी बाजी
पुणे : वडगाव शेरी आणि वाघोली येथील होरांगी तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी राजाराम भिकु पठारे स्टेडीयम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ‘पुमसे’ आणि किरोगी (फाईट) या क्रीडा प्रकारात यश मिळवले. होरांगी तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत अकॅडमीच्या अन्वी बांगर, मानस पसारकर, अविरल त्रिपाठी, प्रित वांद्रे, मानस भट्ट, निल धोका, गंगाधर कुलकर्णी, धनेश थाराकन, युतिका कुमार, क्रिश केदगोणी, सर्वेश केदगोणी, आरविन पिलाकुडी, शौनक सरदेशमुख, तनिष्क बांगर, आरुष सणस, अर्णव सणस, गौरी चौहान, आयुषी भंडारी, आकांक्षा धानूरकर, सुमेधा साखरे, मनस्वी सिंग, तेजस्व सिंग, शौर्य मुजूमदार, प्रिश गुप्ता, आरीनी तांबाळे, अदवेत जाधव, आन्न्या कपूर, ओजस्वीनी शर्मा, अक्षदा धानूरकर, मंथन देवी, अनुजा पवार, समिक्षा यमजाल, रवि यमजाल, सान्वी क्षेत्री यांनी राष्ट्रीय स्पर्धेत ‘पुमसे’ आणि किरोगी (फाईट) या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
रिओना फ्रंडाडीज, त्रिशा भदोरीया, अनुज सिंग, कुनाल सिंग, अनघा लाड, प्रज्वल हलाली, कालिंदी सरदेशमुख यांनी रौप्यपदक पटकावले. तसेच शनाया करकवलसा, प्रज्वल भोसले, प्राप्ती काळे, मोदीत दुबे यांनी कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारताकडून महाराष्ट्र, दिल्ली तेलंगना, राजस्थान, पंजाब, आसाम, गोहाटी, मध्य प्रदेश, गोवा कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा येथील स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण पुमसे आणि किरोगीमध्ये ३,५७५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. होरांगी तायकवांदो अकॅडमीचे अध्यक्ष मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. सुर्वण व रोप्य पदक दरवर्षी प्रमाणे विजेत्यांना दक्षिण कोरीयात विशेष सवलतीची शिष्यवृत्ती चोसन विद्यापीठामध्ये घेऊन जाणार आहे.
स्पर्धेत विशेष सहकार्य करणारे सांरग धोका, योगेश मुदलीयार, श्रीनिवास केदगोणी, शिवाजी भंडारी, प्रशांत वांद्रे, राजिव त्रिपाठी, आरती पसारकर, शलाखा सनस, राखी केदगोणी, हिना देवी, वंदना बांगर यांचे आभार मानले. या स्पर्धेमध्ये राजू प्रसाद, पुजा गुप्ता, विशाल गवते, मनिषा विश्वकर्मा यांनी पुमसे खेळात पंच म्हणून सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच सलग ५ वर्ष साऊथ कोरीयात प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच, मास्टर कपिल अनमल (५ डॅन ब्लॅक बेल्ट), रविंद्र भंडारी यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.