पुणे : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इंस्टिट्यूट ट्रस्ट संचलित ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग आणि केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास १३० विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून आयबीएम, इन्फोसिस, टीसीएस, स्पायसर डाना आदी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यामध्ये नेहा महामुनी, साहिब सिंग मखिजा, अनुग्रह सिंग व सुहेब पिरजादे या विद्यार्थ्यांना जारो एज्युकेशन या नामवंत राष्ट्रीय कंपनीमध्ये १२ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अंतिम वर्षात विशेष कम्युनिकेशन स्कील आणि बुद्धिमत्ता विकास याचे मोफत प्रशिक्षण दिल्याने फायदा झाला, असे संस्थेचे संचालक डॉ. एच. के. अभ्यंकर यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस डायरेक्टर डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. निलेश उके, डॉ. बी. एम. शिंदे आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डायरेक्टर प्रा. अनिल अग्रवाल, प्रा. किरण पवार, प्रा. विजय मेमाने, प्रा. राजूसिंग राठोड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला.
महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावाढ, महाविद्यालयाला मिळालेली नॅकची ‘अ’ श्रेणी आदी बाबी विचारात घेऊन अनेक नामवंत कंपन्या केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये येऊन अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेतात. त्यातून मुलांची निवड करतात. तीनही अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरीची संधी मिळाली आहे, असे कल्याण जाधव यांनी नमूद केले.