पुणे-दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेत वेस्टर्न इंडिया चार्टड अकाउंटंट्स स्टुडन्ट्स असोसिएशनच्या (विकासा) वतीने मानवी साखळीतून ‘सीए’ची प्रतिमा साकारली. देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या ‘सीए’ला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याची संकल्पना यामध्ये होती. ‘विकासा’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली होती.