‘सिंधी प्रीमिअर लीग २’चे शानदार उदघाटन
पुणे : सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सामाजिक संस्थांना मदत या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘सिंधी प्रीमिअर लीग सीझन २’चे शानदार उद्घाटन झाले. पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर हा सोहळा पार पडला. माजी रणजी क्रिकेटपटू कैलास घटानी, जयहिंद हायस्कुलचे माजी प्राचार्य पटेल जवहाराणी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. उद्घाटनप्रसंगी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांकरिता कार्यरत विद्यार्थी सहायक समिती आणि मूकबधिरांसाठी कार्यरत सुहृद मंडळ या संस्थांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
येत्या १८ डिसेंबर पर्यंत ही क्रिकेट स्पर्धा रंगणार असून, त्याचे सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होत आहे. उद्घाटनप्रसांगीं क्रिकेटपटू रोहित मोटवानी, उद्योजक गणेश कुदळे, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी आदी उपस्थित होते. विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त दिनकर वैद्य, नंदकुमार तळेकर यांनी, तर सुहृद मंडळाच्या वतीने चेअरमन श्रीकांत सरपोतदार, अनुराधा फाटरपोड, रजनी फडके यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. यावेळी खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले जात होते.
उदघाट्नचा सामना मस्तकलंदर आणि सिंधफूल रेंजर्स यांच्यात रंगला. सुपर ओव्हरमध्ये सिंधफूल रेंजर्सने हा सामना जिंकला. सिंधफूल रेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या मस्तकलंदर्स संघाने निर्धारित ९ षटकांमध्ये ८ गडी गमावत ४१ धावा केल्या. कुणाल गुडेलाने सर्वाधिक १२ धावा, तर निखिल वाधवानीने १३ चेंडूत १० धावा काढल्या. सिंधफूल रेंजर्सच्या ऋषी तेजवानीने प्रभावी मारा करीत तीन षटकांत १२ धावा देत ४ गडी बाद केले. त्याला हितेश दादलानी याने दोन षटकात १४ धावा देऊन २ गडी बाद करीत उत्तम साथ दिली. विजयासाठी ४२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानांत उतरलेल्या सिंधफूल रेंजर्सची सुरुवात चांगली झाली. मात्र एकालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. ऋषी तेजवानी याने फलंदाजीतही उत्तम कामगिरी करीत ६ चेंडूत ८ धावा केल्या. हितेश दादलानीने १५ चेंडूत ६ धावा केल्या. मस्तकलंदर्स संघाकडून शाम तिल्वानी याने दोन षटकांत ११ धावा देत ४ बळी टिपले, तर निखिल वाधवानी याने तीन षटकांत १४ धावा देत २, तर कुणाल गुडेलाने २ षटकात ५ धावा देत १ बळी घेतला. पहिल्या दिवशीचा दुसरा सामना मोहेंजदरो वोरीअर्स आणि दादा वासवानीज ब्रिगेड यांच्यात, तर तिसरा सामना गुरुनानक नाइट्स आणि इंडस डायनामॉस यांच्यात रंगला.
यावेळी बोलताना कैलास घटानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांना खेळाकडे आणण्यासाठी ही लीग महत्वाची आहे. कोणत्याही खेळामुळे आपले आरोग्य चांगले राहते. सध्या आपण टेनिस बॉलवर खेळतोय हे चांगले आहे. पण भविष्यात लेदर बॉलवर खेळायला हवे. अशा स्पर्धांमुळे सिंधी समाजातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना मला आवडेल.” पटेल जवहारानी म्हणाले, “खेळाबरोबरच या सिंधी युवकांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना सन्मानित करून एक नवा पायंडा पाडला आहे. यामुळे सिंधी समाज उद्योगांबरोबरच सामाजिक कार्यातही पुढे राहील आणि खेळाडूही घडतील असे वाटते.”
या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा) अशी या संघांची नावे आहेत.
सुखवानी लाईफ स्पेसेस, बालाजी होम्स (चंडीरामणी असोसिएट्स), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर व निखिल सुखवानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, झिरो ग्रॅव्हिटी बार अँड किचन (ऋषी तेजवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), बॉम्बे सॅन्डविच (मनीष मनसुखानी), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी) अँड सुखवानी बिल्डर्स (सुरेश सुखवानी), ट्रिनिटी ग्रीन्स (हितेश जेठानी, सागर मुलचंदानी), राजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), जितू पहलानी (गिफ़्ट हॅम्पर्स) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले आहे.