- -2023 पर्यंत 2.1 अब्ज नेटवर्क्ड डिव्हाइस असतील;
- -एकूण नेटवर्क्ड डिव्हाइसमध्ये एम2एम मोड्युल्सचे योगदान 25% (524.3 दशलक्ष) असेल
- – वीस कनेक्शनपैकी एक 5G असेल, 2023 पर्यंत 67.2 दशलक्ष कनेक्शनपर्यंत वाढ होणार
- – 2023 पर्यंत भारतीय 46.2 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्स डाउनलोड करणार
नवी दिल्ली – सिस्को वार्षिक इंटरनेट अहवालाच्या अनुसार, भारतात 2023 या वर्षापर्यंत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 907 दशलक्षहून अधिक असणार आहे. ही संख्या लोकसंख्येच्या 64% असेल. भारतात डिव्हाइस व कनेक्शन यामध्ये लोकसंख्येपेक्षाही (1.0 टक्के CAGR) झपाट्याने वाढ होत आहे (7 टक्के CAGR). यामुळे, घरटी व दरडोई डिव्हाइस व कनेक्शन यांच्या सरासरी संख्येत वाढ होत आहे. दरवर्षी, नव्या स्वरूपातील आणि वाढील क्षमता व बुद्धिमत्ता असणारी नवनवी डिव्हाइस बाजारात दाखल होतात आणि ग्राहक ही डिव्हाइस स्वीकारतातही. स्मार्ट मीटर, व्हीडिओ सर्व्हेलन्स, हेल्थकेअर मॉनिटरिंग, वाहतूक व पॅकेज किंवा अॅसेट ट्रॅकिंग अशा वाढत्या एम2एम अॅप्लिकेशन्स संख्येमुळे डिव्हाइस व कनेक्शन यांच्या वाढीमध्ये मोठे योगदान मिळत आहे. 2023 पर्यंत, एम2एम कनेक्शनचे प्रमाण एकूण डिव्हाइस व कनेक्शन यामध्ये 25 टक्के असेल.
गेली 50 वर्षे, प्रत्येक दशकामध्ये नवे मोबाइल तंत्रज्ञान दाखल करण्यात आले आणि त्याचबरोबर नावीन्यही सादर करण्यात आले. मोबाइल बँडविड्थची गरज व्हॉइस कॉलपासून व टेक्स्टिंगपासून अल्ट्रा-हाय-डेफिनिशिन (यूएचडी) व्हीडिओ आणि विविध प्रकारच्या ऑग्मेंटेड रिअॅलिटी/व्हर्च्युअल रिअॅलिटी (एआर/व्हीआर) अॅप्लिकेशन्सपर्यंत वाढली आहे. जगभरातील ग्राहक व व्यवसाय यांच्या मोबाइल नेटवर्किंगकडून असणाऱ्या नव्या मागण्या व अपेक्षा वाढतच आहेत. हा नवा ट्रेंड मोबाइल अॅप्लिकेशन्सच्या वापरातून व स्वीकारार्हतेतून अधोरेखित होतो. सोशल नेटवर्किंग, व्हीडिओ स्ट्रीमिंग व डाउनलोड, व्यवसायाची उत्पादकता, ई-कॉमर्स, गेमिंग यामुळे मोबाइल अॅप्लिकेशन्सच्या वाढीला चालना मिळणार आहे आणि 2023 पर्यंत डाउनलोडची संख्या अंदाजे 46.2 अब्जापर्यंत वाढणार आहे.
“ग्रामीण व दूरवरच्या भागांमध्येही डिजिटल साक्षरता, मोबाइलचे प्रमाण व इंटरनेट कनेक्टिविटी यामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने इंटरनेटचा वापर व कन्झमशन पद्धती यामध्ये देशभर प्रचंड बदल दिसून येणार आहेत. इंटरनेटचा वापर व कन्झमशन पद्धती यामध्ये झालेली वाढ ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याच्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या क्षमतेला आव्हान देणार आहे. फ्लॅटर व अधिक सुरक्षित नेटवर्क सातत्याने वाढते नेटवर्क सांभाळण्यासाठी क्लाउड व एज कॉम्प्युटिंगचा, तसेच ऑटोमेशनचा लाभ घेत आहेत. डिजिटल विश्वामध्ये योग्य गती राखण्यासाठी त्यांना असे करणे गरजेचे आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि एंटरप्रायजेस प्रति बिट खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी संपूर्ण भिस्त सॉफ्टवेअरवर असण्याच्या आणि एज कॉम्प्युटिंगच्या दिशेने वाटचाल कायम ठेवणार आहेत,” असे आनंद भास्कर, व्यवस्थापकीय संचालक, सर्व्हिस प्रोव्हायडर्स सेल्स, सिस्को इंडिया व सार्क, यांनी सांगितले.
सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्टची ठळक वैशिष्ट्ये (2018 – 2023)
सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्टमध्ये मोबाइल व फिक्स्ड ब्रॉडबँड नेटवर्किंग संनेटवर्किंग, तसेच इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या, डिव्हाइस, व कनेक्शन आणि नेटवर्कची कामगिरी व पाच वर्षांच्या अंदाजाच्या कालावधीतील महत्त्वाचे ट्रेंड (2018 – 2023) याबाबत संख्यात्मक अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
2023 पर्यंतचे भारतातील मोबाइल व इंटरनेट युजरबद्दल अंदाज
- भारतात, 2023 पर्यंत, इंटरनेट वापरणाऱ्यांची एकूण संख्या 907 दशलक्ष असेल (लोकसंख्येच्या 64%), 2018 मधील 398 दशलक्षपेक्षा अधिक (लोकसंख्येच्या 29%).
- भारतात, 2023 पर्यंत, मोबाइल वापरणाऱ्यांची एकूण संख्या 966 दशलक्ष असेल (लोकसंख्येच्या 68%), 2018 मधील 763 दशलक्षपेक्षा अधिक (लोकसंख्येच्या 56%).
- 2023 पर्यंत, जागतिक लोकसंख्येपैकी 66 टक्के लोक (5.3 अब्ज लोक) इंटरनेट वापरत असतील.
2023 पर्यंत भारतातील डिव्हाइस व कनेक्शन याबद्दल अंदाज
- भारतात, 2023 पर्यंत, 2.1 अब्ज नेटवर्क्ड डिव्हाइस असतील, 2018 मधील 1.5 अब्जपेक्षा अधिक (7% CAGR)
- भारतात, 2023 पर्यंत, 1.4 अब्ज मोबाइल कनेक्टेड डिव्हाइस असतील, 2018 मधील 1.1 अब्जपेक्षा अधिक (4.2% CAGR).
- भारतात, 2023 पर्यंत, 697.4 दशलक्ष वायर्ड/वाय-फाय कनेक्टेड डिव्हाइस असतील 2018 मधील 359.8 दशलक्षपेक्षा अधिक (14.2% CAGR).
- भारतात, 2023 पर्यंत, सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसमध्ये एम2एम मोड्युल्सचे योगदान 25% (524.3 दशलक्ष) असेल, या तुलनेत 2018 मध्ये 12% (175.0 दशलक्ष), (24.5% CAGR).
- भारतात, 2023 पर्यंत, सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसमध्ये स्मार्टफोनचे योगदान 38% (781.0 दशलक्ष) असेल, या तुलनेत 2018 मध्ये 42% (610.9 दशलक्ष), (5% CAGR).
- भारतात, 2023 पर्यंत, सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसमध्ये कनेक्टेड टीव्हीचे योगदान 12% (255.8 दशलक्ष) असेल, या तुलनेत 2018 मध्ये 10% (152.2 दशलक्ष), (10.9% CAGR).
- भारतात, 2023 पर्यंत, सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसपैकी 78% कन्झ्युमर श्रेणीतील असतील, तर कwill be in the consumer segment by 2023, या तुलनेत 2018 मध्ये 83%. सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसपैकी 22% बिझनेस श्रेणीतील असतील.
- 2023 पर्यंत भारतातील मोबाइलबद्दल अंदाज
- सर्व नेटवर्क्ड डिव्हाइसपैकी 66% मोबाइल-कनेक्टेड असतील (3G व त्याहून कमी, 4G, 5G, किंवा लो पॉवर वाइड एरिया [LPWA]).
- 2023 पर्यंत एकूण 5G कनेक्शन 67.2 दशलक्ष असतील (4.9%), वीस कनेक्शनमध्ये एक 5G
- 2023 पर्यंत एकूण मोबाइल कनेक्शनमध्ये 4G कनेक्शन 53.1% असतील, 2018 पेक्षा दुप्पट वाढ
- एकूण मोबाइल कनेक्शनमध्ये 3G व त्यापेक्षा कमी कनेक्शन 38.7% असतील
- 2023 पर्यंत भारतातील मोबाइल अॅप्लिकेशन्स
- भारतात, 2023 पर्यंत 46.2 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्स डाउनलोड केली जातील, 2018 मधील 20.7 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्सपेक्षा वाढ (17.4% CAGR).
- 2023 पर्यंत 17.8 अब्ज सोशल नेटवर्किंग, मेसेजिंग, मीडिया, उत्पादकता व ई-कॉमर्स मोबाइल अॅप्लिकेशन्स डाउनलोड केली जातील, 2018 मधील 9.2 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्सपेक्षा वाढ (14.1% CAGR).
- 2023 पर्यंत 10.5 अब्ज मोबाइल गेमिंग अॅप्लिकेशन्स डाउनलोड केली जातील, 2018 मधील 6.4 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्सपेक्षा वाढ (10.5% CAGR).
- 2023 पर्यंत अन्य श्रेणीमध्ये (व्यवसायासह) 17.9 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्स डाउनलोड केली जातील, 2018 मधील 5.2 अब्ज मोबाइल अॅप्लिकेशन्सपेक्षा वाढ (28.3% CAGR).
सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्ट फोरकास्ट
सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्ट हा जागतिक, प्रादेशिक व देश स्तरीय अंदाज/विश्लेषण असून त्याद्वारे डिजिटल परिवर्तनाचे मूल्यमापन केले जाते. सिस्को व्हिज्युअल नेटवर्किंग इंडेक्स (व्हीएनआय) फोरकास्ट तयार केलेल्या विश्लेषकांच्या टीमनेच हा अहवालही तयार केला आहे. अहवालामध्ये फिक्स्ड ब्रॉडबँड, वाय-फाय व मोबाइल (3G व त्याहून कमी, 4G, 5G) नेटवर्किंग यांचा समावेश आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या, डिव्हाइस, व कनेक्शन आणि नेटवर्कची कामगिरी व नवीन अॅप्लिकेशनची गरज याबाबत संख्यात्मक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. चार क्षेत्रांतील गुणात्मक विश्लेषण व मूल्यमापनही देण्यात आले आहे: अॅप्लिकेशन्स, सुरक्षा, पायाभूत सुविधा, व कर्मचारी व टीम यांचे सबलीकरण.
सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्ट पद्धती
2018 ते 2023 साठी सिस्को अॅन्युअल इंटरनेट रिपोर्ट™ स्वतंत्र विश्लेषक अंदाजांवर आणि सिस्कोच्या स्वतःच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवर बेतलेला आहे. यासाठी वापरलेली तपशीलवार पद्धत संपूर्ण अहवालामध्ये दिली आहे. जगभरातील व्यवसाय, देशातील सरकारे, नेटवर्क नियामक, शैक्षणिक संशोधक, टेलिकम्युनिकेशन्स कंपन्या, तंत्रज्ञानातील तज्ज्ञ व उद्योग/बिझनेस प्रेस आणि विश्लेषक यांना इंटरनेटमधील वाढीबद्दल विश्वासार्ह माहिती देणे, हे सिस्को® अॅन्युअल इंटरनेट रिपोर्टचे उद्दिष्ट आहे.