अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या उपचारासाठी नाना भानगिरे यांच्याकडून दिडलाखाचे अर्थसहाय्य
पुणे-हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने ,शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे,नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे ,नगरसेविका संगिता ताई ठोसर, उपशहरप्रमुख प्रमुख समीर अण्णा तुपे,मा नगरसेवक विजय भाऊ देशमुख यांच्या वतीने .आपघाती वारकऱ्यांच्या ,उपचारासाठी, नातेवाईकांना नगरसेवक नाना भानगिरे यांनी १लाख ५० हजार रुपयांची मदत दिली .
पंढरपूर ते आळंदी दर वर्षी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात जे,सी,बी मुळे झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज, तसेच अतुल महाराज दगावले, या अपघातात कित्येक वारकरी जखमी झाले या वारकऱ्यांना हडपसर मधील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना ही मदत केली, शिवसैनिक महिला या वेळी उपस्थित होते, त्याचा वाणीत वारकऱ्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले