पुणे-भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आणि महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . भिमाले उद्यान येथे सकाळी ९ ते १ च्या दरम्यान २५ नोव्हेंबर रोजी हे शिबीर सुरु राहणार आहे.जनरल चेकअप,बिपी, शुगर ,डेंटल ,हिमोग्लोबिन ,नेत्र ,अक्युपंचार ,फिजिओथेरपि आदी विषयक च्या सर्व तपासण्या या शिबिरात मोफत होणार आहेत .मार्केट यार्द परिसरातील संदेश सोसायटीत असलेल्या भिमाले उद्यानात होणार्या या शिबिराचा लाभ सर्व गरजूंनी घ्यावा असे आवाहन भिमाले मित्र परिवाराने केले आहे. या शिवाय एका स्नेह मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.