पुणे-दोन हजार लोकांना स्वखर्चाने अन्नधान्य कीट वाटल्यानंतर ,जैन संघटनेच्या मदतीने आरोग्य तपासणी आल्या दारी उपक्रम राबविल्या नंतर आज बालाजी नगर येथील भाजपा नगरसेविका राणी रायबा भोसले यांनी आपल्या प्रभागात केद्रीय आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आज केले. याबरोबरच या गोळ्या कोणी कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबतचे माहितीपत्रक देण्यात आले. यावेळी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नगरसेविका भोसले यांच्या समवेत या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला .