पुणे- घरात थांबलो तर लढाई जिंकलो अशीच अवस्था सध्या असून आपण हि लढाई जिंकण्याचा पुरेपूर निर्धार केला आहे असे येथे महापौर मुरीधर मोहोळ यांनी म्हटले आहे . भाजपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आज कोरोना संकट -लॉक डाऊन च्या मुळे अडचणीत सापडलेल्या ३ हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले . आणि आणखी २ हजार कुटुंबाना शिधा वाटप मोफत करण्याचा संकल्प सोडला .यावेळी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीशमुळीक तसेच भाजपचे संघटक सचिव राजेश पांडे,भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे ,संघचालक दिगंबर परूळेकर,सुधीर जवळेकर नगरसेवक किरण दगडे ,नगरसेविका अल्पना वरपे,श्रद्धा प्रभुने पाठक यावेळी उपस्थित होते . औपचारिक रित्या या मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु करण्यात आले. गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, चना डाळ, हरभरा, हुलगा, मीठ, मसाले, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या अंतर्कगत घरोघरी करण्यात येणार आहे. माझा प्रभाग, माझी जबाबदारी हे ब्रीद नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले तसेच वेडेपाटील यांनी लॉकडाउन सुरू झाले तेंव्हापासून आजतागायत सुरू असलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी, प्रभागातील सोसायटींचे सुरक्षा रक्षक अथवा कामगार ज्यांचा परिवार नाही अश्या ५०० नागरिकांना दररोज न चुकता जेवण वाटप तसेच विशेष म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी पेडिग्री उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्वाच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले.