पुणे- पेशंट येईल आणि मग आपण उपचार करू ..हि वेळ आता नाही . आता घरोघरी ,दारोदारी जाऊन संशयित आजारी व्यक्ती ची तपासणी करून त्यास कोरोना तर नाही ना? याची खात्री करत फिरावे लागेल ..आणि शोधून शोधून कोरोनाचे पेशंट रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून कोरोनाशी २ हाथ करावे लागतील तरच कोरोनाला आपण हद्दपार करू शकू अन्यथा आंधळ्या डोळ्यांनी कोरोनाशी फाईट करण्यासारखे होईल आणि आपला घात होईल असा इशारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक आबा बागुल यांनी दिला आहे. लोकांनी घाबरून न जाता ,कोरोना बरा होवू शकतो हे ध्यानात धरून शासनाला सहाय्य केले तर अवघड काहीच नाही . मात्र आता शंभराहून अधिक वैद्यकीय सुसज्ज अशी पथके दारोदारी तपासणीला पाठवणे गरजेचे आहे. अम्ब्युलंस, पीएमपी च्या उत्तम बसेस यातून हि पथके पाठवावीत अशी सूचना त्यांनी केली आहे.
खरे तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार शासनाने करायला हवा असे ते म्हणाले .या संदर्भात प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याचे म्हटले आहे. या पत्रात असे म्हटले आहे कि,
पुणे शहराची लोक संख्या जवळपास ३५ लाख असून त्यापैकी ८० टक्के लोकसंख्या वसाहती व झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करते. पुणे शहराच्या विविध भागात आजपर्यंत अंदाजे १४१ कोरोना बाधित तसेच कोरोना संशयित रुग्ण सापडले असून निम्म्याच्यावर पुणे अतिदक्षता घेऊन पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांना यामधून दिलासा देण्याची अत्यंत गरज आहे.
पुणे शहरात वसाहती व झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास लाखो नागरिकांकडे काही दिवसात संसर्ग पसरण्याची शक्यता टाळता येणार नाही. यावेळी या बाबींचा विचार करणे हे सावधानतेचा लक्षण होईल असे मला वाटते. शासन स्थरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र शासन तसेच पुणे महानगरपालिका यामध्ये यशस्वी होत आहेत. परंतु काही नागरिक सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असताना भीतीपोटी रुग्णालयात येण्यास तयार होत नाहीत. या नागरिकांना रुग्णालयात येण्यासाठी प्रवृत्त करण्यापेक्षा पुणे शहरात कोरोना चाचणीसाठी फिरत्या ऍम्ब्युलन्सची सेवा देऊन अश्या नागरिकांची तपासणी होईल तसेच संशयित नागरिकांना रुग्णालयात नेऊन उपचार करता येतील व इतरांना होणाऱ्या संसर्गापासून वाचवणे शक्य होईल . यासाठी पुणे शहरात १०० ऍम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टर व पॅथलॅब असिस्टंट ठेऊन कोरोनाची चाचणी करणे सोपे होईल असे आम्हाला वाटते. पुणे शहर आकाराने मोठे असल्याने १०० फिरत्या ऍम्ब्युलन्स अपुऱ्या असतील तर पीएमपीएलच्या वातानुकूलित बसेस मध्ये कोरोना तपासणीची व्यवस्था करता येईल. तसेच काही एनजीओ व समाजसेवी संस्थांकडून मदत घेऊन अशी व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात राबवता येईल . आपण नागरिकांना समोर येण्याचे आवाहन करून देखील नागरिक हलगर्जी पणा करत आहेत त्यामुळे आता आपल्या त्यांना शोधून उपचार देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर रोखण्यास मदत होईल असा विश्वास आहे. यासाठी आपण पुणे शहरात १०० फिरत्या ऍम्बुलन्सची तसेच व पीएमपीएलच्या वातानुकूलित बसेसमध्ये कोरोना तपासणी सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी हि विनंती.