वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे- ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं आज रात्री साडेआठ वाजता हृदय विकाराने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला.
विवेकवादी कार्यकर्ते
डॉ. लागू हे अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड विचारांमुळेही ओळखले जायचे. विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. स्टारडम असूनही त्याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता प्रत्येक सामाजिक कार्यात ते हिरहिरीने भाग घ्यायचे. ‘देवाला रिटायर करा’ हा त्यांचा लेख चांगलाच गाजला होता. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते.
डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी १९६९ मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता. रंगभूमीचं चालतंबोलतं विद्यापीठ अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.
अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरचं नटसम्राट हे नाटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलं होतं. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि तेअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.
डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म: १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७, सातारा) हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते.
कारकीर्दीचा काळ
१९७२-पासून
भाषा
मराठी
हिंदी
प्रमुख नाटके
नटसम्राट
सूर्य पाहिलेला माणूस
मित्र
प्रमुख चित्रपट
सामना
पिंजरा
सिंहासन
वडील
डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
आई
सत्यभामा लागू
श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[२] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.
ते महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलेले होते
चित्रपट –
अगर… इफ (१९७७)
अग्निपरीक्षा (१९८१)
अनकही (१९८५)
अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
आखरी मुजरा (१९८१)
आज का ये घर (१९७६)
आतंक (१९९६)
आपली माणसं (मराठी)
आवाम (१९८७)
इक दिन अचानक (१९८९)
इनकार (१९७७)
इमॅक्युलेट कन्सेप्शन
इंसाफ़ का तराजू (१९८०)
ईमान धर्म (१९७७)
एक पल (१९८६)
औरत तेरी यही कहानी (१९९२)
करंट (१९९२)
कलाकार (१९८३)
कामचोर (१९८२)
Common man (१९९७) (टी.व्ही.)
काला धंदा गोरे लोग (१९८६)
काला बाज़ार (१९८९)
कॉलेज गर्ल (१९७८)
किताब (१९७७)
किनारा (१९७७)
किशन कन्हैया (१९९० )
खानदान (१९८५) (टी.व्ही.मालिका)
खुद्दार (१९९४)
गजब (१९८२)
गलियों का बादशाह (१९८९)
गहराई (१९८०)
गाँधी (१९८२)
गुपचुप गुपचुप (१९८३)
गोपाल (१९९४)
घरद्वार (१९८५)
घर संसार (१९८६)
घरोंदा (१९७७)
घुँघरूकी आवाज़ (१९८१)
चटपटी (१९८३)
चलते चलते (१९७६)
चिमणरांव गुंड्याभाऊ (मराठी)
चेहरे पे चेहरा (१९८१)
चोरनी (१९८२)
ज़माने को दिखाना है (१९८१)
जीवा (१९८६)
जुर्माना (१९७९)
ज्योति बने ज्वाला (१९८०)
ज्वालामुखी (१९८०)
झाकोळ (१९८०)
तमाचा (१९८८)
तरंग (१९८४)
तराना (१९७९)
तौहेँ (१९८९)
थोडीसी बेवफाई (१९८०)
दाना पानी (१९८९)
दामाद (१९७८)
दिलवाला (१९८६)
दिल ही दिल में (१९८२)
दीदार-ए-यार (१९८२)
दुश्मन देवता (१९९१)
दूरीयाँ (१९७९)
देस परदेस (१९७८)
देवता (१९७८)
दो और दो पाँच (१९८०)
दौलत (१९८२)
ध्यासपर्व -मराठी(२००१)
नया दौर (१९७८)
नसीबवाला (१९९२)
नामुमकीन (१९८८)
‘नीयत (१९८०)
पिंजरा (१९७२/I)
पिंजरा (१९७२/II)
पुकार (१९८३)
पोंगा पंडित (१९७५)
प्यार का तराना (१९९३)
प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
फूलवती (१९९१)
बडी बहन (१९९३)
बद और बदनाम (१९८४)
बिन माँ के बच्चे (१९८०)
बुलेट (१९७६)
भिंगरी (मराठी)
मकसद (१९८४)
मगरूर (१९७९)
मंज़िल (१९७९)
मर्द की ज़बान (१९८७)
मवाली (१९८३)
माया (१९९२/I)
मीरा (१९७९)
मुकद्दर का सिकंदर (१९७८)
मुक्ता (१९९४)
मुकाबला (१९७९)
मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
मेरा रक्षक (१९७८)
मेरी अदालत (१९८४)
मेरे साथ चल (१९७४)
मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
रास्ते प्यार के (१९८२)
लव मैरिज (१९८४)
लावारिस (१९८१)
लॉकेट (१९८६)
लूटमार (१९८०)
शंकर हुसेन (१९७७)
शालीमार (१९७८)
शेर शिवाजी (१९८७)
श्रीमान श्रीमती (१९८२)
सदमा (१९८३)
संध्याछाया (१९९५) (टी.व्ही.)
सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
समय की धारा (१९८६)
सम्राट (१९८२)
सरगम (१९७९)
सरफ़रोश (१९८५)
सरफिरा (१९९२)
सवेरे वाली गाड़ी (१९८६)
साजन बिना सुहागन (१९७८)
सामना -मराठी (१९७४)
सितमगर (१९८५)
सिंहासन -मराठी(१९८०)
सुगंधी कट्टा(मराठी)
सौंतन (१९८३)
स्वयंवर -मराठी(१९८०)
हम तेरे आशिक हैं (१९७९)
हम नौजवान (१९८५)
हम से है ज़माना (१९८३)
हाहाकार (१९९६)
हेराफेरी (१९७६)
होली (१९८४)
श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)
अग्निपंख (रावसाहेब)
अँटिगनी (क्रेयाँ)
आकाश पेलताना (दाजीसाहेब)
आत्मकथा (राजाध्यक्ष)
आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
उद्याचा संसार (विश्राम)
उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
एकच प्याला (सुधाकर)
एक होती राणी (जनरल भंडारी)
कन्यादान (नाथ देवळालीकर)
कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
काचेचा चंद्र (बाबुराव)
किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
खून पहावा करून (आप्पा)
गार्बो (पॅन्सी)
गिधाडे (रमाकांत)
गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
चंद्र आहे साक्षीला
चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)
जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
दुभंग
दूरचे दिवे (सदानंद)
देवांचे मनोराज्य (विष्णू)
नटसम्राट (बेलवलकर)
पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
पुण्यप्रभाव (वृंदावन)
प्रतिमा (चर्मकार)
प्रेमाची गोष्ट (के. बी.)
बहुरूपी
बेबंदशाही (संभाजी)
मादी
मित्र
मी जिंकलो मी हरलो (माधव)
मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
यशोदा (अण्णा खोत)
राजमुकुट (राजेश्वर)
राव जगदेव मार्तंड (जगदेव)
लग्नाची बेडी (कांचन)
वंदे मातरम् (त्रिभुवन)
वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
क्षितिजापर्यंत समुद्र
पुस्तके –
झाकोळ (पटकथा)
डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
“लमाण” हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार – १९७८ – ‘मुख्य सहायक अभिनेता’ घरोंदा (हिंदी)
१९९७, कालिदास सन्मान
२००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
२०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
२०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार
श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.