नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज(मंगळवार) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले की, “मला वाटतं की, इस्लामिक दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त पुढाकार कोणीच घेतला नाही.” सीएएवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, “हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, मला यावर काहीच बोलायंच नाही. आशा करतो की, भारत आपल्या नागरिकांसाठी योग्य निर्णय घेईल. पंतप्रधान मोदी एक चांगले नेते आहेत, भारत एक उत्कृष्ट देश आहे. ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यान सहयोग वाढत आहे. भारत मोठ्या प्रमाणात संरक्षण उपकरणे खरेदी करत आहे.”
मोदींसोबत पाकिस्तानविषयी चर्चा झाली- अमेरिका
भारत-पाकिस्तानातील सीमा वादावर प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले की, “मी पंतप्रधान मोदींसोबत पाकिस्नाविषयी चर्चा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत माझेचांगले संबंध आहेत. ते सीमेवरील दहशतवादाला नियंत्रित करण्याचे प्रयत्न करत आहेत. भारत आणि पाकिस्तानदरम्यान काश्मीरचा मोठा मुद्दा आहे.”
मोदी आणि ट्रम्प यांच्यात धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा झाली
> “पंतप्रधान मोदींना वाटतं की, देशातील नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असावं. भारत यासाठी कठोर पाऊले उचलत आहे. दिल्लीतील हिंसाचाराबद्दल विचारल्यावर ट्रम्प म्हणाले की, मी याविषयी मोदींसोबत काहीच चर्चा केली नाही. हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे.
> तालिबानसोबत अमेरिकेच्या शांती करारावर ट्रम्प म्हणाले की, “मी याबाबत मोदींशी चर्चा केली. मला वाटतं की, भारतदेखील यामुळे खुश असेल. अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाकडून होत असलेल्या हेरगिरीवर ट्रम्प म्हणाले की, गुप्तहेरांनी याबाबत मला काहीच माहिती दिली नाही. जेव्हा मला काही माहिती मिलेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेल.
> भारताकडून अमेरिकी उत्पादनावर लादलेल्या शुल्काबद्दल ट्रम्प म्हणाले की, भारत बहुदा सर्वात जास्त टॅक्स वसुल करणाऱ्या देशांपैकी आहे. हार्ले डेविडसनला यामुळेच खूप जास्त टॅक्स द्यावा लागतो. अमेरिकेला समानतेची वागणूक द्यावी.