अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने आज मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात आपल्या भाषणाला सुरुवात करत म्हणाले की, “अमेरिकन लोक भारतावर प्रेम करतात हे सांगण्यासाठी आम्ही 8,000 मैलांनंतर आलो आहोत. 5 महिन्यांपूर्वी अमेरिकेने आपले महान पंतप्रधानांचे स्वागत केले होते. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आमचे स्वागत केले. सुंदर आणि नवीन मोटेरा स्टेडियमवर येऊन संबोधित करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आमच्या हृदयात भारतासाठी विशेष स्थान राहिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन देखील या महान देशाच्या प्रवासाला अधोरेखित करते. ते त्यांच्या वडिलांसोबत चहा विकत होते. ते याच शहरात एक कॅफेटेरियात काम करत होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत ते निवडून आले. तुम्ही फक्त गुजरातचे प्रतिक नाहीत तर भारतीय जे हवे ते पूर्ण करतो याचे तुम्ही एक प्रतीक आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथा असाधारण मार्गाने प्रगती करण्याची आहे. ही भारताची देखील कहानी आहे. भारत जगभरातील मानवतेसाठी आशा आहे. हा जगातील सर्वात अद्वितीय देश आहे.”
भारत-अमेरिका दोन स्वतंत्र देश, पण आत्मा एक
“मोदींवर सर्वच प्रेम करतात. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो ते खूप कणखर आहेत. जो देश आपल्या लोकांना सर्व बंधनांतून मुक्त ठेवतो आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करू देतो, तोच देश महान असतो. भारत अशा देशांमधील एक आहे. पंतप्रधान मोदींचा आपल्या लोकांवर विश्वास आहे. ही चांगली बाब आहे. आमच्या दोन देशांत काही फरक आहे. परंतु आमचा आत्मा एक आहे. स्वामी विवेकानंद यांनी याचे एकदा उल्लेख केला होता. याच आत्मविश्वासाने भारतीय लोक धौर्य राखतात आणि संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवातात.”
“बॉलिवूड सृर्जनशीलताचे एक उदाहरण आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे भांगडा, रोमान्स, ड्रामा आणि क्लासिकचे एक उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर पासून विराट कोहली पर्यंत भारत महान खेळाडूंचा देश आहे. या देशाने स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या देशातील लोक वाईटावरील विजयाच्या उत्सवाच्या रुपात दिवाळी सण साजरा करतात. भारतात रंगांचा उत्सव होळी आहे. भारत हा असा देश आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा आदर करतो. येथे कोट्यवधी हिंदू-मुस्लिम, सिख, जैन, इसाई आणि बौद्ध एकमेकांसोबत राहतात.”