पुणे- कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सभा, समारंभ, उत्सव, जत्रा, यात्रा, अगदी लग्न समारंभ साजरे करू नयेत असे शासनाने अवाहन केले होते. मात्र, छगन भूजबळ यांनी सरकारच्या अवाहनाकडे दुर्लक्ष करत हडपसर पुणे येथील न्यु इग्लिश मेडिअम स्कुलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास हजेरी लावली. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंध करण्यासाठी मंत्री महोदयच गंभीर नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे दीड हजार लोकांनी गर्दी केली होती.
बावधन (ता.वाई)येथील भैरवनाथ यात्रा कमिटीवर प्रशासनाने कारवाई केली. शाळेच्या संस्थाचालक व भूजबळ यांच्यावर काय कारवाई होईल याकडे लक्ष आहे. आज सकाळी 11 वा शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी दोनदा हा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला. मात्र तिसर्यांदा कार्यक्रम झाला. तो सरकारने सभा समारंभावर बंदी घातल्यावर पार पडला.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आजचा शाळेचा कार्यक्रम यापूर्वी दोनवेळा ठरुन रद्द झाला होता. तिसऱ्या वेळेस सर्व तयारी झाली होती. पण, ऐनवेळी शासनाचा आदेश आला. तरीदेखील खबरदारी म्हणून आम्ही फक्त छोटा कार्यक्रम करुन पुतळ्याचे उद्घाटन केले आणि सभा रद्द केली. कोरोनाच्या उपाययोजनेबद्दल सांगाताना भुजबळ म्हणाले की, शासनाकडून संशयितांना क्वारेंटाइन केले जात आहे. तसेच, संबंधित रुग्णाच्या औषधोपचाराची सर्व व्यवस्था आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर चाचणी केली जात आहे. संशयित आढळल्यास त्याला रुग्णालयात दाखल केले जात आहे. तसेच, त्या-त्या रुग्णाच्या जिल्हातील प्रशासनाला त्याची माहिती दिली जात आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना डिझास्टर मॅनेजमेंट कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत.