दिल्ली – देशभरात कोरोनाव्हायरसचे आतापर्यंत 1030 प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी रात्री उशिरा मध्यप्रदेशात 5 नवीन केस (इंदूर 4, उज्जैन 1) समोर आल्या आहेत. भीलवाडामध्ये रविवारी आणखी एक संक्रमित आढळून आला. देशातील एकूण संक्रमितांची संख्या covid19india.org वेबसाइटनुसार आहेत. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत सध्या कोरोना संक्रमितांची संख्या 918 आहे, त्यातील 867 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 86 ठीक झाले आहेत. शनिवारी देशभरात कोरोना संक्रमणाचे 179 केस समोर आल्या. वृत्तसंस्था पीटीआयनुसार हा देशातील एका दिवसातील कोरोना संक्रमणाचा सर्वात मोठा आकडा आहे. याआधी शुक्रवारी 151 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या दरम्यान रविवारी सकाळी विशेष विमान इराणहून 275 भारतीयांना घेऊन राजस्थानच्या जोधपुरला पोहोचले. या लोकांना येथील लष्कराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. याआधी देखील 277 भारतीयांना इराणमधून बाहेर काढले होते.त्यांना देखील याच सेंटर मध्य ठेवण्यात आलेे आहे.