पुणे :- विद्यार्थ्यांनी त्यांच्या योग्यतेनुसार योग्य करिअरची निवड करण्यासाठी ‘करिअर कनेक्ट २०१९’ या करियर एक्स्पोचे आयोजन गोयल गंगा इंटरनैशनल स्कुच्यावतीने नुकतेच करण्यात आले. १३ वर्ष मुलांना करिअरसंदर्भात मार्गदर्शन करणारे निखील भटनागर व बेससेट एज्युकेशन इंडियाच्या (Bassett Education India) सीईओ विद्या मूर्ती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पारंपारिक क्षेत्रातील निवडी व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या व नाविन्यपूर्ण क्षेत्रातील शिक्षणाच्या संधीं तसेच करियरविषयी येणाऱ्या अडचणी, त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
त्यांचे करीयरविषयक विचार ऐकण्यासाठी उत्साहपूर्ण वातावरणात गोयल गंगा इंटरनैशनल स्कुच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवानी, शिक्षक, पालक आणि असंख्य विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्या मूर्ती यांनी येणाऱ्या भविष्यासाठी आवश्यक अशी १० कौशल्ये आत्मसात करणे किती गरजेची आहेत याबद्दल माहिती दिली.
सोनू गुप्ता म्हणाल्या कि, सॅटच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात याविषयी उपस्थितांशी संवाद साधला.याशिवाय करियर संदर्भातील माहिती देताना योग्य करिअरची निवड योग्यवेळी करणे किती गरजेचे आहे यावरही त्यांनी प्रकाश टाकला. एक्सपोमध्ये लॉ,अभियांत्रिकी,डिजायनिंग, मेडिसीन, फोटोग्राफी, माहितीपट-चित्रपट तयार करणे, भाषा कौशल्ये, स्कील एज्युकेशन, रोबोटिक्स, क्रीडा, संशोधन व विकास आणि परदेशी शिक्षण अशा १६ प्रकारच्या विषयांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.आजच्या युगात स्पर्धेसोबतच करिअरच्या संधीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हे समजून घेऊन आपले करिअर निवडण्यासाठी किती नवनवीन पर्याय व त्यातील करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हाच एक्स्पो आयोजित करण्यामागचा उद्देश होता.