कसब्या’त काँग्रेस आघाडीच्या कोपरा सभांना प्रतिसाद
पुणे: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या नेत्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्यासाठी ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन सोमवारी प्रचाराचा धडाका लावला. प्रत्येक सभेला लोकांनी गर्दी केली आणि घोषणा देऊन जोरदार प्रतिसाद दिला.
कसबा मतदारसंघातील अपुरा पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी अशा दैनंदिन जीवनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून महाराष्ट्रातील बंद पडलेले दोन लाख छोटे मोठे कारखाने, नोकरकपात, भाजपने दिलेल्या आश्वासनांमधील खोटेपणा यावर वक्त्यांनी भर देऊन सरकारवर जोरदार टीका केली. कसबा मतदारसंघातील पेठांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न अगदी बिकट आहे, महिलांमध्ये याविषयी तीव्र असंतोष असून सत्ताधारी भाजपच्या निष्क्रीयतेबद्दलचा राग मतपेटीत उमटेल असे वक्त्यांनी सांगितले. पेठांमधील पाणीप्रश्न कॉंग्रेसने वारंवार मांडला, आंदोलन केली असे सांगितले आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे पाण्याचा प्रश्न सोडवायला प्राधान्य देतील अशी ग्वाही नेत्यांनी दिली.
,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद शिंदे यांच्या प्रचारार्थ नागेश्वर मंदिर ,दारुवाला पूल, डुल्या मारुती ,गोविंद हलवाई या चौकांमध्ये कोपरा सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रविंद्रजी माळवदकर, वनराज आंदेकर,.गणेश नलावडे,विरेंद्र किराड,दिपक जगताप,राजेंद्र आलमखाने,.किरण कद्रे,.विजय खराडे,अजित दरेकर,.बुवा नलावडे,जयसिंग भोसले,.हेमंत येवलेकर,चेतन मोरे,प्रवीण करपे, सुरेश परदेशी आणि बाळासाहेब सोनवणे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय कामगार संघा ( इंटक)चे अध्यक्ष सुनिल शिंदे आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अरविंद शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. इंटकचे सभासद प्रचारात सक्रीय झाले आहेत