कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने पुण्यात पहिला उमेदवारी अर्ज रमेश बागवेंचा दाखल (व्हीडीओ)
पुणे-कॉंग्रेस राष्ट्रवादी आरपीआय आघाडीच्या वतीने आज पहिला उमेदवारी अर्ज पुणे कॅन्टोनमेंटमधून अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी दाखल केला आहे .यावेळी प्रथमतः कॅम्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या तसेच कुटुंबियांच्या समवेत बागवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . खासदार वंदना चव्हाण ,माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,मोहन जोशी,अनंतराव गाडगीळ ,शरद रणपिसे ,अभय छाजेड ,अविनाश बागवे,रफिक शेख ,राहुल डंबाळे,विठ्ठल थोरात ,जेनब बागवे,लता राजगुरू ,सुजाता सदानंद शेट्टी ,संगीता तिवारी ,रोहित जोशी,वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर आदीअसंख्य कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते .