नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या 1 तासाच्या भेटीच दोन्ही नेत्यांमध्ये काय नेमकी काय चर्चा झाली, याविषयी अद्याप कळू शकले नाही. मात्र, ही चर्चा कोणत्या विषयावर झाली, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.