पुणे: कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” या सेंटरद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्याने मानसिक आरोग्य व दिव्यांग क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विविध विभागांच्यावतीने निधी उपलब्ध करून देत दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे औचित्य साधून कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” या सेंटरच्या उद्घाटन सामारोह्प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर होते तर डॉ प्रवीण परगावकर, सेंटरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण, महाविद्यालयाचे प्र. संचालक डॉ महेश ठाकूर, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या स्पर्धेच्या युगात बहुतांशी विद्यार्थी व पालक हे विविध प्रकारच्या ताण- तणावाखाली वावरताना दिसून येत असून अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी, पालक तसेच समाजातील सर्वच घटकांच्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी हे केंद्र उपयोगी ठरणार असून विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मदतीने विविध उपक्रम हाती घेऊन मानसिक आरोग्य व दिव्यांग क्षेत्राशी संबंधित विविध योजना, नवीन अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यासाठी चालना देण्यात येणार असल्याचे डॉ नितीन करमळकर यांनी सांगितले.
कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेले “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” हे सेंटर कर्वे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, महाविद्यालy परिसरातील वाडी-वस्तीमधील नागरिक आणि या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरावे आणि खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्य व दिव्यांग शिक्षण, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पुढाकारासाठी हे सेंटर नावारूपास यावे अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
सेंटरचे अध्यक्ष व समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांनी सेंटरची ध्येय्य, धोरण, व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वलन व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. महेश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ प्रवीण परगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सायली रावराणे यांनी केले. तर आभार समीक्षा महाबळेश्वरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहिनी दामले, सायली रावराणे, निखील डोंगरे, अपूर्वा भारमल, रोहिणी हुद्दार, दत्ता करचे, स्नेहल माहुलकर, मुकेश ठोके, प्रीतेश बदर, वैशाली अद्वैता, अरुंधती कुलकर्णी, मोतीलाल सोनटक्के, नंदा वायनगंनकर, मिलिंद सोसे, सीमा पोलाया आदींनी विशेष परिश्रम घेतले