– आठवी आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धा २०१९
‘स्विस लीग’ पद्धतीच्या प्रथम फेरीत भारताच्या प्रशांत मोरे याने यू. एस. ए. च्या अजय अरोरा वर विजय मिळविताना २५-१७ अशी झुंझ द्यावी लागली. या सामन्यात सहाव्या बोर्डमध्ये अजय अरोरा ने स्पर्धेतील पहिली ब्रेक टू फिनीश ची नोंद केली. भारताच्या संदीप दिवे ने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालदिवच्या अजमीन इस्माईल चा २५-० ने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील दूसरी ब्रेक टू फिनीश नोंद करून मात केली. भारताच्या जहीर पाशा ने एकतर्फी रंगलेला सामना मालदिवच्या आदील आदम चा २५-७ असा पराभव करताना ब्रेक टू फिनीशची नोंद केली.
फ्रान्सच्या डूबियोस पीयरे ने एकतर्फी झालेल्या सामनयात भारताच्या गीता देवीचा २५-४ पराभव करून आगेकूच केली. भारताची विश्वविजेती एस. अपूर्वा ने कॅनडाच्या डंगोई रूपकि‘श्नावर २५-१ असा विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
रंगतदार स्पर्धेचा उद्घाटन समारंभाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष श्री. जोसेफ मेयर, श्री. वी. डी. नारायण सचिव, श्री. रकिबुल हुसेन अध्यक्ष ऑल इंडिया कॅरम फेडरेशन, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे श्री. जितेंद्र एम. शाह अध्यक्ष, श्री. भारत देसडला कार्याध्यक्ष, श्री. अरूण केदार व श्री धनंजय साठे उपाध्यक्ष, श्री. यतिन ठाकूर सरचिटणीस, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे चे सचिव नंदू सोनावणे, पी. वाय. सी. हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, सचिव श्री. आनंद परांजपे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत कॅरम बोर्डवर खेळून पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. अरूण केदार यांनी केले.
——————————————————————————
स्विस लीग – प्रथम फेरी
के. श्रीनिवास (भारत) वि. वि. अबु बाकर मोहंमद युनुस (मलेशिया)- २५-०
जहीर पाशा (भारत) वि. वि. आदील आदम (मालदिवस)- २५-७
निशांत फर्नांडो (श्रीलंका) वि. वि. इर्शाद एहमद (भारत)- २५-१२
रश्मि कुमारी (भारत) वि. वि. अलि नाहर (यु.ए.ई)- २५-०
प्रशांत मोरे (भारत) वि. वि. अजय अरोरा (यु.एस.ए)- २५-१७
रहमान हाफिजूर (बांग्लादेश) वि. वि. आजम खान मोहंमद (यु.ए.इ)- २५-१
काजल कुमारी (भारत) वि. वि. चदनी रैमा (बांग्लादेश)- २५-०
शहिद इलमी (श्रीलंका) वि. वि. अहमद अनास (श्रीलंका)- २५-०
महंमद अहमद मुल्ला (बांग्लादेश) वि. वि. रेबेका दलराईन (श्रीलंका)- २५-५
एस. अपूर्वा (भारत) वि. वि. डंगोई रूपकि‘श्ना (कॅनडा)- २५-१
डूबियोस पीयरे (फ्रान्स) वि. वि. गीतादेवी (भारत)- २५-४
संदीप दिवे (भारत) वि. वि. अजमीन इस्माईल (मालदीव)- २५-०
राजेश गोईल (भारत) वि. वि. कैसर सलाउद्दीन (बांग्लादेश)- २५-८
इस्माईल अब्दुल मुतालिब (मलेशिया) वि. वि. नजरूल इस्लाम (यू.के)- २५-७
पीटर बोकर (जर्मन) वि. वि. मकसूदा शूमसाने नहार (बांग्लादेश)- २५-१