पुणे- सभागृहनेता पदावरून अडीच वर्षे झाल्याने तुम्ही पायउतार झालात , तुमच्या कारकीर्दीबाबत कोणाच्या मनात शंका नाही , मात्र आता मी पदावर नाही म्हणून पालीअका कारभारापासून तुम्हाला अलिप्त राहता येणार नाहि ,आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर पालिकेच्या कारभारावर आपली पकड कायम ठेवा ,कारभारावर लक्ष राहू द्या असा सल्ला माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याचे वृत्त आहे.
भिमाले कुटुंबीयांनी यावेळी त्यांचे पुणेरी पगडी शाल देवून स्वागत केल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर झाले आहेत .
चंद्रकांतदादा यांनी भिमाले यांच्या निवास्थानी जावून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भिमाले हे विधानसभे साठी पर्वती मतदार संघातून इच्छुक होते .मात्र तिथे विद्यमान आमदार आणि भ्जाप्च्या शहराध्यक्ष माधुरी मिसाल यांना उमेदवारी मिळाली . मात्र याबाबत तक्रार न करता नाराजी व्यक्त न करता भिमाले यांनी मिसाळ यांना विजयी करण्यात हाथभार लावला .त्यानंतर पालिकेत त्यांचे सभागृहनेते पद देखील पक्षाने ठरविलेला कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार सोडले . आणि पालिकेच्या सभागृहात विद्यमान नवनिर्वाचित सभागृहनेते धीरज घाटे यांच्या मदतीला ते उभे राहिले .या सर्व बाबींची योग्य दखल पक्षाने घेतल्याचे या पार्श्वभूमीवर मानले जाते आहे.