पुणे-,
कोरोनापासून मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने पुणे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, पत्रकार, वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना दैनंदिन वापरासाठी २० हजार मास्क महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वाटपासाठी सुपूर्द करण्यात आले.
कोरोनापासून बचावासाठी राज्यात मास्कचा तुटवडा आहे. याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी संवेदना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने २० हजार मास्क तयार करुन घेऊन पुण्याचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केले. या मास्कपैकी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांना दहा हजार, पोलीस कर्मचाऱ्यांना पाच हजार, पत्रकारांना एक हजार आणि विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना चार हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनापासून बचावासाठी राज्यात भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण राज्यात सेवाकार्य राबविले जात असून, याचाच एक भाग म्हणून आज पुण्यात अत्यावशक सेवेचा भाग असलेले पोलीस, पत्रकार, वैद्यकीय विभागातील कर्मचारी, आदींच्या सुरक्षेसाठी मास्क तयार करुन घेतले. हे सर्व मास्क महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे आज सुपूर्द केले, असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
त्यासोबतच कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरांना एक हजार एचवन मास्कचे संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. पुण्यातही अशाप्रकारे डॉक्टर, परिचारिकांना कोरोनापासून बचावासाठी एच वन मास्कचे वाटप करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.