पुणे-
शिवाजीनगर मतदारसंघात प्रभाग क्र 7 मधील आरोग्य सेवक, झाडणकाम करण्याच्या कर्मचाऱ्यांना कोरोना वायरस प्रतिबंधासाठी सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी, मुकादम व आरोग्य सेवक उपस्थित होते. आपल्यासाठी स्वताःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी माझे हे छोटेसे पाऊल आहे,सहाय त्याने गरजूंना सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझर द्यावेत असे आवाहन हि माळवे यांनी केले
दरम्यान भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मतदारसंघा तर्फे १० वी च्या विध्यार्थ्यांना कोरोना पासून काळजी घेण्यासाठी मास्क चे वाटप करण्यात आले. आदर्श विद्यालय व सरस्वती मंदिर या दोन्हीं शाळे मध्ये ३५० विद्यार्थ्यांना मास्क वाटप भा.ज.पा विद्यार्थी आघाडी पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी केले.पालकांनी सांगितलं कि १० वि चे पेपर सुरु झाले तेव्हा भारतीय जनता पार्टी ने गुलाबाचा फुल देऊन शुभेच्छा दिल्या व आज सामाजिक बांधीलकी जपत मास्क वाटल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
मास्क चे वाटप कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कोंढरे व नगरसेविका गायत्री खडके यांच्या हस्ते या वेळी प्रतीक देसरडा , सुनील मिश्रा ,दिलीप पवार , प्रणव गंजीवाले , अनिरुद्ध कंक व इतर पदाधिकारी उपस्थित होते . या उपक्रमाचं प्रतिक नितीन गुजराथी ( संपर्कप्रमुख – विद्यार्थी आघाडी पुणे शहर ) यांनी केले.